नोकरीवर परत जाणाऱ्या महिलांसाठी उत्तम कार्यक्रम असलेल्या ८ कंपन्या
करियर मध्ये पुनरागमन करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. महिलांसाठी, कामावर पुन्हा रुजू होणे हे तर अधिकच कठीण असते कारण त्यांच्या करियर मधून विश्रांती घेण्याचे कारण मुख्यतः वैयक्तिक असते आणि हा कालावधी देखील जास्त असतो. परंतु, भारतात अश्या काही कंपन्या आहेत ज्या महिलांची क्षमता जाणतात आणि त्यांना त्यांच्या कौशल्याला झळाळी देण्याचा आणि करियर मध्ये पुनरागमन करण्याच्या समान संधी उपलब्ध करून देतात. पुढे काही अश्या कंपन्या दिल्या आहेत ज्या उत्तम बॅक टू वर्क कार्यक्रम राबवतात:
#1. सेकंड करियर इंटर्नशिप प्रोग्राम (एससीआयपी) – टाटा
टाटाचा सेकंड करियर इंटर्नशिप प्रोग्रामचा शुभारंभ मार्च २००८ मध्ये झाला. हा अश्या महिलांसाठी करियर ट्रान्झिशन मॅनेजमेंट प्रोग्राम आहे ज्यांनी काही कारणास्तव ६ महिने किंवा त्याहून अधिक काळासाठी ब्रेक घेतला होता आणि पुन्हा व्यावसायिक जगतात परत येऊ इच्छितात. हा प्रोग्राम अश्या महिलांना टाटा समूहाच्या विविध कंपन्यामध्ये, कामाच्या तासांमध्ये लवचिकपणा असले अश्या संधी प्रदान करतो. हा प्रोग्राम महिलांना ब्रेकनंतर त्यांचा दुसरा डाव खेळण्यासाठी उत्तम संधी देतो.
#2. ब्रिंग हर बॅक प्रोग्राम – आयबीएम
आयबीएमचा ब्रिंग हर बॅक प्रोग्राम अश्या स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी तयार केला आहे ज्यांनी करियरच्या मध्ये विश्रांती घेतली आहे. आवश्यक कौशल्ये असलेली कोणतीही महिला यासाठी अर्ज करू शकते, आणि जास्तीत जास्त तीन वर्षे वैयक्तिक विश्रांती घेतलेले कोणीही या प्रोग्राम साठी पात्र आहेत आणि या प्रोग्राममध्ये उच्च स्तरीय आव्हान असलेल्या प्रकल्पाची इंटर्नशिप असते.
#3. सेकंड करियर प्रोग्राम – करीयर्स २.० गोदरेज
करीयर्स २.० हे गोदरेजने ब्रेकनंतर कामावर परत येणाऱ्या महिलांसाठी उचललेले पहिले पाउल आहे. या प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी महिलांकडे किमान २ वर्षाचा पूर्वानुभव असणे आवश्यक आहे. हा प्रोग्राम महिलांना थेट व्यवसाय प्रकल्पांवर ३-६ महिन्यांसाठी पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ तत्वावर काम करण्याची संधी देतो आणि त्यांना प्रकल्पाच्या स्वरूपानुसार स्टायपेंड सुद्धा देतो.
#4. करियर बाय चॉइस –हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयुएल)
एचयुएल चा करियर बाय चॉईस प्रोग्राम महिलांना करीयर ब्रेक घेतल्यानंतर कॉर्पोरेट जगात परत येण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने व्यापक ट्रान्झिशन प्रोग्राम निर्माण करण्याच्या गरजेनुसार बनवला आहे. गोदरेजच्या करीयर्स २.० प्रमाणेच, या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्हाला कामाचा २ वर्षाचा पूर्वानुभव असणे आवश्यक आहे. हा प्रोग्राम महिलांना प्रोजेक्ट गाईडसह थेट प्रोजेक्टवर काम करण्याची संधी देतो. घरून काम करण्याच्या पर्यायासोबतच कामाच्या वेळेमध्ये देखील लवचिकपणा ठेवला आहे.
#5. बॅक इन द गेम (बी. आय. जी.) – फिलिप्स
बॅक इन द गेम (बी.आय.जी.) हे फिलिप्स इंडिया द्वारे अलीकडेच उचललेले पहिले पाउल आहे जे करियर मधून (जीवनशैली, वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही कारणास्तव) ब्रेक घेतल्यानंतर परत येऊ इच्छिणाऱ्या महिलांना फिलिप्स मधील कॉर्पोरेट करियर मध्ये संधी प्रदान करून देतो. या इंटर्नशिप कार्यक्रमाचा उद्देश्य फिलिप्स मध्ये पुन्हा करियर सुरु करणाऱ्या या शिकाऊंना आवश्यक मार्गदर्शन आणि लवचिक वातावरण प्रदान करणे आहे.
#6. होम टू ऑफीस - इंटेल
इंटेल इंडिया ने आगळ्यावेगळ्या ‘होम टू ऑफिस किंवा एच२ओ’ चा शुभारंभ केला आहे जो कौटुंबिक किंवा वैयक्तिक गरजांमुळे करियर मधून ब्रेक घेतलेल्या महिलांना कामावर परत येण्यास मदत करेल. या दोन महिलांना एच२ओ च्या मदतीने कामावर परत येण्याचे अनुभव सांगताना पहा.
#7. रीस्टार्ट – जीई इंडिया
जीई च्या जॉन एफ वेल्च टेक्नोलॉजी सेंटर, बंगळूर येथील रीस्टार्ट प्रोग्राम हा असा प्रोग्राम आहे जो केवळ करियर ब्रेक घेतलेल्या आणि पुन्हा कामावर जाऊ इच्छिणाऱ्या महिला शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर यांनाच भरती करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
#8. री-कनेक्ट – एक्सिस बँक
२०१४ मध्ये, एक्सिस बँकने री-कनेक्ट प्रोग्राम सुरु केला - हा एक असा प्रोग्राम आहे जो निवडक राज्यांमधील १० वर्षाच्या कालावधीत सिस्टीम सोडलेल्या माजी महिला कर्मचाऱ्यांना नोकरी देऊ करतो.