कार्यबल यशस्वीपणे परत मिळवण्यासाठी ५ टप्पे
धंद्यात परत येणाऱ्या व्यावसायिकांना नेहमीच चिंता वाटत असते की ब्रेकनंतर परत काम सुरु करणे नाउमेद करणारे असेल. पण आमच्यावर विश्वास ठेवा, असे काहीच नाही. तुम्ही आजही तितक्याच सक्षम, व्यावसायिक आहात जेवढ्या तुम्ही करियर मधून ब्रेक घेण्यापूर्वी होतात आणि जेव्हा तुम्ही घरी राहणाऱ्या आईची भूमिका बजावत होतात तेव्हा तुम्ही काही उत्कृष्ट कौशल्ये मिळवली आहेत!
तुमचे जुने, आत्मविश्वासू स्वरूप तुम्हाला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी, आम्ही ५ टप्प्यांचे मार्गदर्शक तयार केले आहे जे तुमचा पुनरारंभ यशस्वी करण्याची खात्री देते. आपल्या करियरचा पुनरारंभ करण्याचा नियोजित दृष्टीकोन, या कार्याला सोपे आणि कार्यक्षम बनवू शकतो. सुरवातीच्या काळात, तुम्ही काय करू इच्छिता हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ घेतला पाहिजे; त्यानंतर आपण पर्याय शोधू शकता आणि पुढे जाऊ शकता.
टप्पा १ : निश्चित व्हा
तयार होणे हा पहिला टप्पा आहे. बऱ्याच वेळा नियुक्त करणारे मॅनेजर कामावर पुन्हा परत येणाऱ्या मातांकडे पाहून विचार करतात, “ती तयार आहे का? ती ही जबाबदारी पेलू शकते का? जर ती सोडून गेली तर?” ते संकोच करतात. तुम्हाला हेच प्रश्न स्वतःला देखील विचारले पाहिजेत. पूर्ण खात्री करून घ्या की कामावर परत जाण्याचा निर्णय तुम्ही काळजीपूर्वक घेतला आहे, आणि हे शक्य करण्यासाठी तुम्ही योग्य तयारी केली आहे. तुम्ही कामावर परत जाण्यासाठी खरोखर तयार आहात याची खात्री करून घ्या.
या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा:
१. मला आता काम करण्याची किती इच्छा आहे?
२. मी करियर ब्रेक का घेतला आहे? माझी सध्याची कर्तव्ये काय आहेत? ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे का?
३. मला कोणत्या गोष्टींचा आधार आहे?
टप्पा २: आपल्या करियरच्या पर्यायांचे मूल्यमापन करा
तुम्ही पूर्वी ज्या पदावर काम केले आहे त्याच्या सारख्या पदांचाच शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करून नोकरी बाबतच्या संभावनांवर मर्यादा घालू नका. करियर मेधील ब्रेक नंतर नोकरी शोधत असताना, आवश्यक असलेल्या कौशल्यांकडे लक्ष द्या, नोकरीच्या पदाकडे नाही.
करियर ब्रेकला पर्याय शोधण्याची संधी समजा. तुमचे मागील करियर तुमच्या इच्छेनुसारच होते की तुम्ही करियर बदलण्याचा विचार करत आहात. हे ठरवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्या कौशल्यांचे मूल्यमापन करा आणि याचा विविध क्षेत्रातील विविध पदांसाठी कसे वापरू शकतात याचा विचार करा. आपल्या दुसऱ्या करियर पर्यायाचा विचार करा.
तसेच, हे सुद्धा समजून घ्या की करियर बदलणे म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग आहे, आणि हा निर्णय सहजपणे घेऊन चालणार नाही. या नवीन करियर मध्ये काय-काय होऊ शकते हे पूर्णपणे जाणून घ्या. आणि तुम्ही या करियरसाठी उचित आहात का? झेप घेण्यापूर्वी तुमचे नवीन करियर शोधा.
टप्पा ३: कुटुंबाकडून सहाय्य मिळवा
तुमच्या कुटुंबासोबत कामावर परत जाणे सुरु करण्याबाबत चर्चा करा. तुम्हाला मुलांचे संगोपन आणि सर्व कार्यांचा ताळमेळ बसवण्याची सत्यपरिस्थिती याचा देखील विचार केला पाहिजे. तुम्हाला कुटुंबाकडून कश्या प्रकारच्या समर्थनाची आणि सहाय्याची अपेक्षा आहे याची परिवारातील व्यक्तींसोबत सखोल चर्चा करा. तुमच्या जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या मदतीचे नियोजन करणे महत्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही कामावर परत जात असाल तेव्हा तुमच्या परिवाराची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या जोडीदाराची मदत मिळवा. परस्परांकडून काय अपेक्षा आहेत याची चर्चा करा आणि बाल संगोपनासाठी तसेच इतर कर्तव्यांसाठी योजना तयार करा. तडजोड हाच मार्ग आहे. तुमच्याप्रमाणेच तुमचा पती देखील तडजोड करेल. लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक आदर्श निर्माण कराल. घरकाम आणि मुलांची देखभाल यासाठी मदत मागा, आणि तुम्ही जर पौष्टिक अन्न नाही बनवू शकलात तर स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका. तुम्ही सुपरवूमन नाही बनू शकत हे ध्यानात ठेवा.
काम आणि घर दोन्ही गोष्टी सांभाळणे हे एक दिव्य कार्य आहे. तुमच्या हातून सर्व कार्ये ‘उत्कृष्ट’ झाली नाही तरी स्वतःला वाईट वाटून घेऊ नका.
टप्पा ४ : तुमची व्यावसायिक कौशल्ये सुधारत रहा
तुम्ही कामावर जात नसताना, खूप काही बदल झाले असू शकतात. नवीन ट्रेंड आणि तंत्रज्ञान आलेले असेल. घाबरून जाऊ नका. तुम्हाला जे आधीपासून माहित आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सुदैवाने, नवीन ट्रेंड आणि तंत्रज्ञान शिकण्यासाठी काही ऑनलाइन अभ्यासक्रम आहेत ज्यासाठी तुम्ही नाव नोंदणी करू शकता. काही आभ्यासक्रम विनामुल्य आहेत, तर काही महाग आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात सर्वात नवीन ट्रेंड काय आहेत ते शोधा आणि ही कौशल्ये प्राप्त करण्यासाठी आभ्यास करा.
टप्पा ५: नौकरी शोधण्याची कौशल्ये सुधारा
नोकरी शोधण्याचे कौशल्य आत्मसात करून स्वतःची रोजगारक्षमता वाढवा. ट्विटर आणि लिंक्डइनवर स्वतःला प्रदर्शित करा. तुमच्या मुलाखतीचा सराव करा. तुमची कौशल्ये आणि तुम्ही कोणत्या प्रकारची संधी शोधत आहेत हे थोडक्यात सांगणारे भाषण तयार करा. तुम्ही ज्या पदावर कार्य केले आहे त्याबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही ज्या प्रकारची कामे करू इच्छिता याबद्दल बोलण्यावर लक्ष केंद्रित करणे हे अधिक योग्य आहे असे आम्ही सुचवतो. नोकरी शोधण्याच्या तुमच्या कार्यात नेटवर्किंग अतिशय महत्वाचे आहे. बाहेर पडून तुमच्या क्षेत्रातील किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करू इच्छिता त्या क्षेत्रातील लोकांना भेटा. पुढील संधी कुठे मिळेल हे तुम्ही सांगू शकत नाही.
व्यावसायिक गटामध्ये सामील व्हा - तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सहयोग आढळेल. काम करणाऱ्या महिलांचा सपोर्ट ग्रुप तुम्हाला चांगले सल्ले देऊ शकतो. तुमच्या माजी विद्यार्थी संघटनेत सक्रीय बना - तुम्ही कित्येक वर्षापूर्वी पदवी मिळवली असली तरीही - हा एक उत्तम स्त्रोत आहे.
तुमचे करियर सोडून देणे सोपे कार्य नव्हते, आणि ते पुन्हा सुरु करणे सुद्धा सोपे जाणार नाही. पण आता तुम्ही अधिक सुजाण, आणि अधिक हुशार आणि अधिक सामर्थ्यवान आहात. जग तुमच्या परत येण्याची वाट पहात आहे!
तुमच्या कडे ‘कामावर परत रुजू होण्याची’ कथा आहे का? आमच्यासोबत ती अवश्य शेअर करा!