1494913646photo
SHEROES
26 Feb 2018 . 1 min read

आपल्या देशात फेअरनेसला / गोरेपणाला गरजेपेक्षा जास्त महत्व आहे


Share the Article :

fairness is overrated fairness is overrated

मी इथे प्रामाणिक आणि न्यायपूर्ण बनण्याच्या प्रयत्नांबद्दल बोलत नाही आहे. मी इथेफेअरशब्द त्या अर्थाने वापरतो आहे ज्याअर्थी केवळ भारतीय वापरतातत्वचेच्या गोरेपणाचे वर्णन करण्यासाठी.

 

जातीबद्दल बोलायचे तर भारत एक अद्वितीय देश आहे. आपण अतिशय गोरे नाही किंवा अतिशय काळेही नाही आहोत. आपण पूर्णपणे तपकिरी सुद्धा नाही आहोत. खूप गोरा वर्ण म्हणजे व्हेरी फेअर (आपल्या त्वचेच्या रंगाचे वर्णन करण्यासाठी केवळ भारतात वापरण्यात येणारी एक विशिष्ट संज्ञा) पासून गव्हाळ वर्ण (भारतात वापरण्यात येणारी अजून एक संज्ञा) ते काळा वर्ण अश्या त्वचेच्या रंगाच्या वैविध्यपूर्णतेमुळे आणि विविधतेमुळे समाजात गहन पूर्वग्रह आणि भेदभाव निर्माण झाला आहे आणि या भेदभावाचा सर्वात जास्त त्रास विशेषतः स्त्रियांना होतो.

 

भारतीय लोकांची या विषयावर मानसिकता समजून घेण्यासाठी तुम्हाला फक्त कोणत्याही वृत्तपत्राचा विवाहसुचक विभागातील वधू पाहिजे ही जाहिरात वाचली पाहिजे. पालक आणि समाज मुलगी गोरी होण्याचीच अपेक्षा करतो यात काही नवल नाही, कारण अनधिकृतपणे ठरवून करण्यात येणाऱ्या विवाह संस्थेच्या बाजारात गोरेपणालाच जास्त किंमत आहे आणि फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीनुसार जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ गोरेपणाच कामी येतो हे उघड आहे.

 

गोरेपणा प्राप्त करण्यासाठी ह्या फेअरनेस क्रीम्समुळेच तुम्ही स्वतःला आहे त्या परिस्थितीत स्वीकारत नाही आणि टाल्कम पावडर आणि फेअरनेस क्रीम्सचे चिलखत घातल्याशिवाय जगातील लोकांबरोबर वावरण्यासाठी योग्य लायकीचे नाही आहात असे तुम्हाला वाटते. ही बाब कमी स्वाभिमान आणि स्वतःला स्वीकारण्यात असमर्थता दर्शवते. आणि हे नुकसान एकाच दिवसात झालेले नाही आहे. भारतातील मुलींसोबत हे त्यांच्या बालपणापासून ते त्या मोठे होत असताना दर दिवशी केले जात असते. आपण मुलांना कश्या प्रकारची वागणूक देतो याचा परिणाम त्यांच्या प्रौढपणीच्या वर्तणुकीवर होत असतो.

 

एवढेच काय तर, नुकत्याच जन्मलेल्या बाळाची सुद्धा यातून सुटका होत नाही. नवजात बाळाला भेटायला येणाऱ्या सर्व वृद्ध स्त्रिया बाळाच्या चेहऱ्याला निरखून पाहतात आणि मुलीच्या गोरेपणा किंवा गोरी नसल्यावरून पालकांचे भाग्य उजळले आहे किंवा नाही ते घोषित करतात. असे विशेषतः लहान शहरांमध्ये किंवा उत्तर भारतातील ग्रामीण भागांमध्ये होतच असते. आज्या किंवा कधी-कधी आयासुद्धा मुली काळ्या होतील म्हणून त्यांना सूर्यप्रकाशात खेळायला मनाई करतात. मुलांची त्यांच्या त्वचेच्या रंगानुसार तुलना करतात आणि जे गोरे आहेत आणि म्हणूनच सुंदर आहेत अश्या इतर मुलांशी प्रशंसा करतात. गोरेपणा मिळवण्याची धडपड ही काही नवीन गोष्ट नाही. गोऱ्या त्वचेची तीव्र इच्छा दर्शवणाऱ्या अनेक जुन्या म्हणी आहेत. त्यातील एक आहे - ‘निव्वळ गोरेपणा चेहऱ्यातील दहा दोष लपवू शकतो’. रंगाच्या बाबतीत असलेला हा भेदभाव लिंगभेदासहित कार्य करतो. जेव्हा एखादा मुलगा कृष्ण वर्णीय असतो तेव्हा असे बोलले जाते की पुरुष जेवढा काळा तेवढा जास्त देखणा दिसतो पण मुलींच्या बाबतीत मात्र ती कशी दिसते हेच सर्वात जास्त महत्वाचे असते. “खरे सौंदर्य मनात असते आणि पुस्तकाच्या कव्हरवरून त्याच्याविषयी मत बनवू नकाअश्या म्हणी मुलींच्या बाबतीत वापरल्या जात नाहीत. मुलींना खरोखरच त्यांच्या बाह्य सौंदर्यानुसार पारखले जाते आणि गोरेपणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक जास्त महत्व दिले जाते. भारतामध्ये सुंदरता म्हणजे इतरांच्या तुलनेत अधिक गोरेपणा असा समज निर्माण झाला आहे, कारण इथे गोरेपणाला गरजेपेक्षा जास्त महत्व आहे.

 

जन्मापासून गोरे असणारे लोक सुद्धा यास अपवाद नाहीत. त्यांना अधिक जास्त गोरे व्हायचे असते. गोरेपणाची ही तहान कधीही तृप्त होत नाही. अश्या अनेक मुली पहिल्या आहेत ज्या उजळ बनवणारी सर्व उत्पादने वापरून गोरेपणाच्या साखळीत वर जायचा प्रयत्न करतात. एकदा तर मी एका वधूचे असेही वर्णन ऐकले आहे की ती इतकी गोरी आहे की खोलीत उजेड नसताना देखील ती बल्ब सारखी चमकते! भारतीय समाजाच्या गोरेपणा बद्दलच्या ध्यासाची तुम्ही कल्पना करू शकता का? अश्या मानसिकतेमुळे तरुण मुलींचे होणारे खरे नुकसान म्हणजे त्या सौंदर्य आणि स्व-प्रतिमेबाबतीत स्वतःला कमी लेखतात. जास्त गोरी नाही असे घोषित केल्यामुळे त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमी होतो. त्या स्वतःला आहेत तसे कधीही स्वीकारत नाही आणि त्यांचे कौशल्य, ज्ञान अश्या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि जीवनात खरा बदल निर्माण करण्याऐवजी फेअरनेस उत्पादनांच्या सहाय्याने आपल्या त्वचेचा रंग लपवण्याचा भलताच प्रयत्न करतात.


फेअरनेस उत्पादनांचे समर्थन  करण्यास नकार देणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींविषयी मला आदर वाटतो. सर्व सुशिक्षित व्यक्तींना माहित असते की तुम्ही तुमच्या त्वचेचा रंग बदलू शकत नाहीत. हे तुमच्या जनुकांमध्ये असते. तरीही यामी गौतम आणि आलिया भट सारख्या अभिनेत्री फेअरनेस क्रीम्सच्या अश्या भ्रामक जाहिरातीत काम करतात. या अश्या स्त्रिया आहेत ज्या गोरा वर्ण घेऊनच जन्माला आलेल्या आहेत आणि अश्या उत्पादनांचा वापर करून गोऱ्या झालेल्या नाही आहेत. त्यांना हे माहित आहे आणि तरीही त्या अश्या जाहिराती स्वीकारतात ज्या सहज प्रभावित होणाऱ्या तरुण मनाला भ्रमित करू शकतात. ते या उत्पादनांचे समर्थन नाही करत आहेत तर या देशात गोऱ्या वर्णासह जन्माला येणे हे फायद्याचे आहे या विधानाचे समर्थन करतात. आणि मला वाटते की हे चुकीचे आहे.


15196381931519638193
SHEROES
SHEROES - lives and stories of women we are and we want to be. Connecting the dots. Moving the needle. Also world's largest community of women, based out of India. Meet us at www.sheroes.in @SHEROESIndia facebook.com/SHEROESIndia

Explore more on SHEROES

Share the Article :

Responses

  • V*****
    Nice. mi adha khup lokana pahil Asher je chehryane Gore astat. Agdi padh