महिलांनी नोकरी का केली पाहिजे? – ही ३० चांगली कारणे आहेत
जर तुम्हाला वाटते की “त्याचे (तिचे) माझ्यावर प्रेम आहे / नाही” हा सर्वात कठीण प्रश्न आहे तर हे कदाचित
बरोबर असू शकते किंवा चुकीचे असू शकते.
का? कारण, असा अजून एक प्रश्न आहे जो (जर अधिक कठीण नसल्यास) तेवढाच कठीण आहे, तो म्हणजे
“तिने नोकरी करावी का नाही? – विशेषतः जर ती विवाहित / माता असेल तर”. या विषयावर माझ्या
माहितीतील जवळ-जवळ सर्वच मंडळांमध्ये बऱ्याच वेळा चर्चा आणि वादविवाद झाले आहेत. त्याचे/तिचे वय
कितीही असले तरी, या विषयावर जवळपास प्रत्येकाचा पक्का विचार, मत आणि दृष्टीकोन असतो - माझ्या
शेजाऱ्यांचे आजोबा, माझी आई, माझी सासू, माझ्या मैत्रिणी, माझे सहकारी, माझी मुलगी, माझ्या जवळच्या
कुटुंबातील कुत्रा, माझे दूरचे काका/काकी ज्यांनी मला लहानपणी एकदाच बघितले होते....आणि इतर फुटकळ
लोक या सर्वांचे पक्के मत असते. पण अर्थातच, आपण अश्या युगात राहत आहोत जेथे आपल्याला विचार
स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य आहे, आणि साहित्य आणि कथा देखील बऱ्याच प्रमाणात आहेत!
इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की .....
मला माहित आहे की बऱ्याच महिलांसाठी या प्रश्नाचे उत्तर देणे आणि ते उत्तर स्वतःला पटवून देणे हे किती
कठीण काम आहे.
मला माहित आहे की बऱ्याच महिलांसाठी जगासमोर या प्रश्नाचे उत्तर मांडणे आणि त्या उत्तराच्या
परिणामाला सामोरे जाणे किती कठीण काम आहे.
मला माहित आहे की बऱ्याच महिलांसाठी हे उत्तर दररोज कृतीत उतरवणे आणि समोर येणाऱ्या संकटांना तोंड
देणे किती कठीण काम आहे.
का?
कारण, मी या सर्व परिस्थितींमधून गेलेली आहे, आणि हे सर्व केले आहे! आणि जीवनातील इतर सर्व
गोष्टींप्रमाणेच – यात काही चांगले, वाईट आणि भयानक अनुभव असतात.
आणि तरीही, जो कोणीही माझे बोलणे ऐकतो त्यांना माहित आहे की मी #वुमेनअॅटवर्क ची खंबीर समर्थक
आहे.
महिला विश्वात काय नवीन ट्रेंड आहे हे जाणून घेत रहा. विनामुल्य शीरोज चे सदस्य व्हा!
बऱ्याचदा मी स्वतःला विचारते “महिलांनी नोकरी का करावी?” आणि माझे उत्तर असते:
1. तुम्ही कमावता. एखाद्या स्त्रीच्या जीवनाचा दर्जा आणि विपुलता यांना प्रभावित करणाऱ्या घटकांपैकी आर्थिक स्वावलंबन आणि स्वातंत्र्य हे महत्वाचे घटक ठरू शकतात. चांगल्या दर्जाचे जीवन आणि आदर मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या, मुक्तता मिळवून देणाऱ्या महत्वाच्या पैलूंपैकी हा एक महत्वाचा पैलू ठरू शकतो.
2. तुम्ही शिकता. वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या वाढीसाठी शिक्षण हा पायाभूत आधार आहे आणि तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा तुम्ही जे ज्ञान मिळवता त्याला काही सीमाच नसते (किंवा तुमची सीमा क्षितिजापलीकडे असते).
3. तुमच्याकडे तुमची स्वतःची ओळख असते – तुमच्या वैयक्तिक नातेसंबंध आणि ओळखी पलीकडील. तुमचा स्वतःचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही.
4. तुम्ही अधिक चांगल्या मालकीण बनता कारण नोकरी करणाऱ्या जवळपास सर्वच महिला घरी/ घरगुती कामांसाठी - म्हणजे घराच्या देखभाली करता जसे की ड्राईव्हींग/जेवण सफाई/इस्त्री करणे इत्यादी कामांसाठी इतरांची मदत घेतात. तुम्ही स्वतः नोकरी करून इतर अनेक महिलांना कामाची संधी पुरविता आणि तुमच्याकडे काम करणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यात महत्वपूर्ण योगदान देतात.
5. तुम्ही जीवनातील विविध अनुभवांचा एक भाग बनता आणि ज्यामुळे तुम्ही स्वतःला, जगाला आणि जीवनाला अधिक उत्तम रीतीने समजू शकतात.
6. तुम्ही जीवनातील सर्व प्रकारच्या /विविध स्तरांवरील व्यक्तींशी संवाद साधू शकता आणि यामुळे तुमचेमन, विचार, मते आणि दृष्टीकोन व्यापक बनतात.
7. तुमचे सर्वसाधारण ज्ञान वाढते - चार भिंती पलीकडील जगाचा भाग बनून तुम्ही बघता, ऐकता ज्यामुळे तुम्हाला बरेच काही समजते.
8. तुम्ही चार भिंतींमधील विश्व आणि चार भिंतींबाहेरचे विश्व यामधील फरक आणि भेद यांचे कौतुक करता. माझ्यावर विश्वास ठेवा, नोकरी करणारी स्त्रीला काय करावे लागते याबद्दलचे तुमचे विचार नक्कीच बदलतील!
9. तुम्हाला लोकांचा स्वभाव आणि वास्तविक जगात कश्या प्रकारे कार्य होते हे समजते.
10. चार भिंती पलीकडे जीवन किती न्यायपूर्ण / अन्यायपूर्ण आहे ते तुम्हाला पाहायला मिळते - याला कलियुग उगाच नाही म्हटले जात. आणि यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाकडे कश्या दृष्टीने पाहता आणि कश्या प्रकारे जीवन जगता हे बदलते.
11. तुमचा स्वतःचा आत्मविश्वास लक्षणीय रित्या वाढतो - तुम्हाला स्वतःविषयी दृढ विश्वास वाटू लागतो.
12. तुमचे कुटुंब तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागते - बऱ्याचदा, यामुळे तुमच्या बद्दलचा आदर आणि तुमचे मूल्य वाढते.
13. तुम्ही निर्णय घेण्यास अधिक सक्षम, सज्ज आणि सशक्त बनता - कारण तुम्हाला माहित असते की तुमच्याकडे अशी संधी आहे.
14. तुम्ही तुमच्यासाठी “खरेदी” करू शकता - होय! तुम्ही एखाद्या (काही) व्यवसायांसाठी चांगली आशा आहात. तुम्ही अर्थव्यवस्थेत पैश्यांची भर घालता आणि पैसे चलनात आणण्यास मदत करता.
15. तुम्ही एखाद्याचा आदर्श बनू शकता - मला माहित आहे की माझ्यासाठी आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये बऱ्याच अश्या स्त्रिया आहेत ज्या प्रत्येक दिवसाच्या कार्यात समतोल साधतात.
16. आपण अनेक महत्वाची “जीवन कौशल्ये” शिकता. त्यातील सर्वात महत्वाची कौशल्ये आहेत वेळेचे व्यवस्थापन, संभाषण, वाटाघाटी, नाही म्हणणे.
17. तुम्ही बऱ्याच नकोशा गोष्टी मागे टाकणे शिकता - याचे कारण बऱ्याच वेळा तुमच्याकडे भूतकाळात अडकण्यासाठी आणि भविष्यकाळाची चिंता करण्यासाठी वेळच नसतो.
18. तुम्ही कोणाला तरी कोठे तरी प्रेरणा देऊ शकता - “हे शक्य आहे, तुम्ही हे करू शकता” या वाक्याचे उत्तम उदाहरण बनू शकता.
19. तुम्ही इतरांसाठी गोष्टी “खरेदी” करू शकता - आणि तुम्हाला या बद्दल कमी प्रश्न विचारले जातात, आणि तुम्हाला कोणत्याही/सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नसते.
20. तुम्ही नवीन नजरेने जीवनाकडे पाहता.
21. तुम्ही तुमच्या आई-वडिलांचे, आणि शिक्षकांचे आणि सहाय्यकांचे / समर्थकांचे मुल्य अधिक चांगल्या प्रकारे ओळखता.
22. तुम्ही वेळेचे मूल्य अधिक चांगल्या प्रकारे समजता. आपल्या कडे किती कमी/जास्त वेळ आहे हे तुम्ही ओळखता.
23. तुम्हाला अधिक स्वावलंबी वाटते.
24. तुमचे स्वतःच्या जीवनावर अधिक जास्त नियंत्रण असते.
25. तुम्ही तुमच्या कुटुंबाला स्वावलंबन / इतरांवर अवलंबन शिकवता.
26. तुम्ही उत्पादक भागीदार (आर्थिक जगताचा) बनून जागतिक अर्थव्यवस्थेत योगदान देता.
27. तुम्ही पैश्याचे मोल अधिक चांगल्याप्रकारे समजता आणि प्रशंसा करता.
28. “त्याचे” जीवन कसे आहे हे तुम्ही “योग्यरीत्या” समजू शकता - कारण नेहमी तोच सर्वात जास्त कालावधी साठी काम करत असतो.
29. तुम्ही तुमच्या मुलांच्या आयुष्यात प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे महत्वाची भूमिका बजावता.
30. शक्यता आहे की तुम्ही तुमच्या आगामी पिढीसाठी संपन्न वारसा (आर्थिक आणि अन्यथा) निर्माण कराल.
ती काय काम करते यामुळे काहीही फरक पडत नाही
ती कुठे काम करते यामुळे काहीही फरक पडत नाही
ती कसे काम करते यामुळे काहीही फरक पडत नाही
ती किती वेळ करते यामुळे काहीही फरक पडत नाही
ती काम करते आहे यामुळे फरक पडतो
आज, उद्या आणि त्यांनतरचा प्रत्येक दिवस
तिच्या नोकरी करण्यामुळे तिच्या / त्यांच्या आयुष्यात काय बदल होतो हे महत्वाचे आहे
ही पोस्ट आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर नोकरी केलेली आहे अश्या कोणत्याही / सर्व स्त्रियांना समर्पित आहे.
या टोळीची लोकसंख्या अशीच वाढत राहु दे, त्यांची भरभराट होऊ दे आणि त्यांना समृद्ध होऊ दे.
