एकत्र कुटुंबामध्ये राहणाऱ्या भारतीय जोडप्यांनी सेक्स करणे एवढे वाईट आहे का?

Last updated 5 Mar 2018 . 1 min read



Having sex in joint family Having sex in joint family

विवाहित असल्याची कल्पना करा. सोपे आहे? आता एकत्र कुटुंबामध्ये विवाह झाला असल्याची कल्पना करा - होय, बहुतेक भारतीय जोडप्यांप्रमाणे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत जवळीक साधायची असल्यास तुम्ही हे कसे कराल? कल्पना करू शकता का? एखाद्या दिवशी काहीही कारण नसताना तुम्हाला तुमच्या जोडीदाराला मिठी मारावीशी वाटते, पण तुम्ही असे करू शकत नाही. जेव्हा तुम्हाला सहजच तुमच्या साथीदाराला चुंबन द्यावेसे वाटते, परंतु तुम्ही नाही देऊ शकत. किंवा टीवी वर एखादा रोमँन्टिक सिनेमा लागलेला असतो आणि तुम्हाला तो सिनेमा बघताना तुमच्या साथीदाराचा हात धरावासा वाटतो, पण तुम्ही नाही धरू शकत. कारण? तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये रहाता.

तात्विकदृष्ट्या बघितले तर भारतीय कुटुंबाची सर्व काही वाटून घेण्याची आणि एकाच छताखाली राहण्याची मुल्ये नक्कीच चांगली वाटतात, परंतु सासू-सासरे, दीर-भावजई, त्यांची मुले आणि कधीतरी येणारी नणंद यांच्या सोबत एका छताखाली राहताना रोमँटिक बनणे हे एकमेकांना प्रेम दर्शविण्याची इच्छा असणाऱ्या तरुण जोडप्यांसाठी अवघड ठरू शकते.

जोरात सेक्स आणि एकत्र कुटुंब - ही समस्या कशी सोडवता येईल, असे चटणीपुडी विचारते. “सात प्रदीर्घ वर्षे झाली आहेत आणि मी आजही माझ्या मनातून काढून टाकू शकत नाही की लोक आम्हाला सेक्स करताना ऐकू शकतात.” असे तिने मान्य केले आहे. डॉ. संजीव त्रिवेदी याविषयी एक साधा व्यवहारिक सल्ला देतात  - “पार्श्वसंगीत लावा.” संगीता सिन्हा असे सुचवतात की जोराने गाणे लावणे हा एक उपाय असू शकतो, पण ती हे सुद्धा काबुल करते की, “ती स्वतः कधीही कुटुंबासोबत राहिली नसल्यामुळे ती या समस्येला योग्यरीत्या समजू शकत नाही.” पण हे सुद्धा मानते की “हे त्रासदायक असू शकते.”

भारतातील गरीब किंवा अश्या इतर समाजामध्ये त्यांच्याकडे एका शयनगृहाची देखील सुविधा नसते आणि तरीही ते वैयक्तिक शयनगृह असलेल्या श्रीमंतांपेक्षा जास्त लोकसंख्या वाढवतात. “अश्या लोकांना आपली प्रणयक्रिया ऐकली जाण्याची जरा जास्तच भीती असते,” असे तपनमुजुमदार यांना वाटते. त्याला असे वाटते की जीवन हे काही “कलात्मक” किंवा अश्या कोणत्याही प्रकारच्या सिनेमानुसार घडत नसते आणि आपल्यापैकी सर्वात जोराने ओरडणाऱ्या लोकांचा आवाज चांगल्या प्रतीच्या, बंद दरवाज्याबाहेर ऐकला जाऊ शकत नाही. “हा माझा अनुभव आहे, दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी घेतलेला,” तो लबाडपणे हसत सांगतो. असे म्हणत असताना लक्षात घ्या की आपण एखादा गंभीर गुन्हा घडत असल्याबद्दल नाही बोलत आहोत, जो अतिशय गुप्तपणे केला पाहिजे. आपण एकाच वेळेस प्रजनन आणि मनोरंजन बद्दल दोन्ही क्रियांबद्दल बोलत आहोत. “दरवाजाच्या बाहेर असताना वाटणारे कुतूहल, प्रत्येकाच्या विचारांनुसार उत्तेजित करणारे किंवा गोंधळात टाकणारे असू शकते. आत असलेल्या लोकांकडे उत्तेजना लपवण्याची सभ्यता असली पाहिजे. खरे तर, जितका अधिक जास्त आणि अधिक वास्तविक आनंद तितके ओरडणे कमी असते. ओरडणे हे सामान्यतः खोटपणा दर्शवितो; अस्तित्वात नसेलेल्या भावनांचा नकली जाहीरपणा. याचा उद्देश्य हा असू शकतो की अस्तित्वात नसताना देखील लोकांना जवळीक असल्याचे दाखवणे,” असा तपनचा विश्वास आहे.

नौफल खान मस्करी करतो की, “तुम्ही त्यांना घाबरवण्यासाठी अधिक जोरात ओरडले पाहिजे. मी तर असेच करेन.” आयेशाचा सुद्धा हाच सल्ला आहे, “थोडे अजून जोरात ओरडा आणि त्याहून जोरात कण्हल्यासारखा आवाज करा.”

भारतातील मेन्स हेल्थ मासिकाने नुकत्याच घेतलेल्या सर्वेक्षणात असे स्पष्ट झाले आहे की, गोंगाट असलेल्या ‘एकत्र कुटुंबात’ पालकांसोबत आणि वयात आलेल्या भावंडासोबत रहात असल्यामुळे, भारतीय जोडप्यांना सेक्स करण्यासाठी हवा असलेला एकांत पुरेसा मिळत नाही.

एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना सेक्स करणे खरच एवढे वाईट आहे का? कदाचित असेल, कदाचित नसेल - ज्यांना या गोष्टीचा अनुभव आहे तेच या विषयावर खरे मत देऊ शकतात. पण ज्यांना प्रणया दरम्यान जोरात ओरडायला आवडते त्यांच्या साठी मात्र हे कठीणच आहे. पण एक गोष्ट एकदम खरी आहे - जोराने ओरडणे तर सोडा, पण भिंती पलीकडले सौम्य आवाजात कण्हणे सुद्धा संपूर्ण कुटुंबाला ऐकायला जाऊ शकते. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा अंथरुणात असताना तो म्हणेल, ‘माझे नाव घेऊन ओरड’ तेव्हा तुम्ही काय कराल? नजरेनेच त्याला गप्प कराल?

 

15198121121519812112
SHEROES
SHEROES - lives and stories of women we are and we want to be. Connecting the dots. Moving the needle. Also world's largest community of women, based out of India. Meet us at www.sheroes.in @SHEROESIndia facebook.com/SHEROESIndia


Share the Article :