होममेकर्स आणि हाउसवाईफ : एकाच नाण्याच्या दोन बाजू

Last updated 13 Mar 2018 . 1 min readDifference between Homemaker and housewife Difference between Homemaker and housewife

मला चांगले आठवते की माझ्या लहानपणी माझी आईच घरी काबाडकष्ट करत असे आणि माझे वडील मात्र तयार होत असत आणि कामासाठी बाहेर निघून जात असत. मी मोठी होत असताना, बऱ्याच कुटुंबामध्ये सामान्यतः अशीच परिस्थिती असायची. बऱ्याच कुटुंबांमध्ये वडीलच कर्ता पुरुष असायचे आणि आईचे काम सर्वांची देखभाल करणे असे. यामुळे, साहजिकच, माझे वडील व्यवस्थापकाची भूमिका बजावायचे तर आई गृहिणीची. सामान्यतः, जेव्हा मला लोक माझ्या पालकांबद्दल विचारायचे, तेव्हा मी कार्यालयातील माझ्या वडिलांच्या हुद्द्याबद्दल अभिमानाने सांगायची. पण जेव्हा आईबद्दल बोलायचे वेळ येत असे, तेव्हा मी थोडी चुळबूळ करत असे आणि हळू आवाजात त्यांना सांगत असे की ती हाउसवाईफ आहे. याचा अर्थ मला तिच्याबद्दल लाज वाटते असा नव्हता.

“हाउसवाईफ” हा शब्दच भ्रामक आहे. मला त्या वयात जी समज होती त्यानुसार ती माझ्या वडिलांची बायको होती, घराची नव्हे. म्हणून या शब्दामुळे मी गोंधळात पडले.

जशी मी मोठी होत गेले, तसा माझा गोंधळ दुखाःत बदलत गेला. अश्या क्षुद्रपणाला माझी आई कशी स्वीकारू शकते? ती फक्त कोणाची तरी बायको असणे कसे स्वीकारू शकते? हे तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला मारक ठरत नाही का? मला माहित नव्हते की यामुळे तिला सुद्धा वाईट वाटेल की नाही, म्हणूनच मी तिला हाउसवाईफ न बोलण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते.

आता माझ्या व्यवसायिक जीवनामध्ये, जेव्हा मी आजही मुलांना त्यांच्या आईला “हाउसवाईफ” म्हणून संबोधताना ऐकते तेव्हा मला वाटते की आजही फारसा बदल झालेला नाही आहे. घरची कामे करणाऱ्या आया आजही बिनपगारी कामगार आहेत. आपल्या घरात दिवस-रात्र मेहनतीने काम करणाऱ्या, स्वयंपाकघरात वावरणाऱ्या, आपल्या साठी गरमागरम, ताजे अन्न बनवणाऱ्या या स्त्रियांचा आपण जरा देखील विचार करत नाही. त्या आपले बिछाने आणि शयनगृह आवरतात. घरभर पसरलेला पसारा आवरतात. आणि आपण त्यांना कधीही नम्रपणे ‘थँक यु’ सुद्धा बोलत नाही.

जेव्हा मी माझ्या मित्र-मैत्रिणी आणि परिचयाच्या व्यक्तींना माझे विचार बोलून दाखवले, तेव्हा त्यांच्यापैकी बरेचजण माझ्या विचारांशी सहमत झाले आणि त्यांनी मान्य केले की त्यांच्या आया, बायका, बहिणी आणि मुलींसमोर कधीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचारही त्यांनी कधी केलेला नाही.

मला आपल्या वागणूकीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल आणायचा आहे आणि त्याची सुरवात घरातील कामे करणाऱ्या स्त्रियांना संबोधित करणारा शब्द बदलून करायची आहे.

हाउसवाईफ नाही, होममेकर्स.

हाउसवाईफ आणि होममेकर्स या शब्दांच्या वापरण्यामध्ये आणि अर्थामध्ये थोडासा फरक आहे. खरतर, हाउसवाईफ या शब्दाला काही अर्थच नाही आहे. या शब्दाच्या वापरातच नाही तर निर्मितीतही चूक आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार, हाउसवाईफचा अर्थ आहे विवाहित स्त्री, जिचे महत्वाचे कार्य आहे तिच्या कुटुंबाची देखभाल करणे, घरचे व्यवहार सांभाळणे, आणि घरातील कामे करणे.

हाउसवाईफ साठी समकालीन शब्द, किंवा जो आज-काल जास्त वापरला जातो तो शब्द आहे होममेकर. हा शब्द अधिक जबाबदाऱ्या टाकत नाही. हाउस वाईफ / होममेकर यांच्या जबाबदाऱ्या अंतहीन असतात. परंतु हा शब्द अधिक मान देणारा आणि घरातील कामे करणाऱ्या महिलांच्या संपूर्ण गौरव आणि व्यक्तिमत्वाला समाविष्ट करणारा आहे.

एक स्त्री चार भिंतीना घरपण देण्यासाठी तिच्या रक्ताचे पाणी करते. ती अशी जागा निर्माण करते ज्याला परिवार ‘होम स्वीट होम’ म्हणू शकतात. ती घरपण देते, कुटुंबाची, मुलांची आणि नातेवाईकांची सेवा करते, आपल्या “स्वतःची” अशी जागा निर्माण करून देते. ही सर्वच कामे स्तुती करण्यायोग्य आहेत.

अलीकडे हाउसवाईफ ऐवजी होममेकर या शब्दाचा वापर करण्यासंबंधी चर्चांना ऊत आला आहे. हाउसवाईफ ऐवजी होममेकर हा शब्द वापरल्याने घरातील कामे करण्याऱ्या स्त्रीसोबतच्या आपल्या व्यवहारामध्ये काही फरक होणार आहे का, हा सुद्धा एक तर्कशुद्ध प्रश्न आहे. याची शक्यता ५०-५० आहे. मान्य आहे!

असे लेबल कोंडमारा करणारे असतात. परंतु आपल्याला जर असेच वर्णन करायचे असेल तर, आपण एका व्यापक शब्दाची निवड करू जो त्या व्यक्तीच्या संपूर्ण क्षमतेला समाविष्ट करतो.

यामुळे बऱ्याच संस्कारक्षम तरुण मनांना त्या गोंधळातून बाहेर पडण्यास मदत होईल ज्याने मला खूप त्रास दिला आणि त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी मला १५ प्रदीर्घ वर्षे लागली.


15203294801520329480
SHEROES
SHEROES - lives and stories of women we are and we want to be. Connecting the dots. Moving the needle. Also world's largest community of women, based out of India. Meet us at www.sheroes.in @SHEROESIndia facebook.com/SHEROESIndia


Share the Article :

Download App

Get The App

Experience the best of SHEROES - Download the Free Mobile APP Now!